परतीची वाट ... नात्यांच्या गुंत्यातून जाणारी!

 परतीची वाट 


बाहेर पडणं किती अवघड

हे गुंतल्याशिवाय समजत नाही,

होणारी ही असीम तगमग

अनुभवल्याशिवाय उमगत नाही..


नात्यांच्या मंद उजेडात

आपण कोणाच्या सावलीत मिसळतो,

तर कधी कोणाच्या शांततेत

आपणच स्वतःला हरवून बसतो..


कधी ओढ इतकी हलकी,

की स्पर्श होऊनही जाणवत नाही,

कधी अंतर इतकं दाट,

की जवळ असूनही भेटत नाही..


गुंतवताना काही गाठी

प्रेमाच्या हे कळत नाही,

आणि सुटताना त्याच गाठी

वेदनेच्या होत्या हे जाणवत नाही..


कधी कधी नाती

सुटण्याची इच्छा नसतानाही सुटतात,

कारण ज्यांना धरून ठेवतो,

तेच हातातून नकळत निसटतात..


आणि शेवटी जाणवतं,

प्रेमाचा अर्थ जवळ ठेवण्यात नाही..

तर

ज्यांच्या सोबत असताना

आपण स्वतःपासून दूर जात नाही,

असं नातं अनामिक असलं तरी

खरं, टिकणारं आणि अत्यंत सुंदर असतं..!

-तेजश्री शिंदे ✍️ 

Comments

  1. नात्यात गुंतून ही हा मोकळेपणा... वाह अप्रतिम मांडणी...आणि परतीचा मार्ग हा स्व गाठणारा असावा हे सांगणारी प्रभावशाली कविता!

    ReplyDelete
  2. खूप छान

    ReplyDelete
  3. 'परतीची वाट' ही कविता मानवी नात्यांच्या अत्यंत नाजूक आणि गहन भावनांना स्पर्श करणारी आहे. शब्दांची तुमची निवड आणि भावनांची मांडणी अत्यंत प्रभावी आहे. नात्यांमध्ये गुंतल्यावर होणारी 'असीम तगमग' असो, वा 'स्वतःला हरवून बसण्याची' भावना, तुम्ही प्रत्येक अनुभव सहृदयतेने व्यक्त केला आहे. विशेषतः, खऱ्या प्रेमाची व्याख्या ("ज्यांच्या सोबत असताना, आपण स्वतःपासून दूर जात नाही...") ही खूपच विचार करायला लावणारी आणि हृदयस्पर्शी आहे. तुमच्या लेखणीतील ही आत्म-शोधाची ओढ वाचकाला अंतर्मुख करणारी आहे

    ReplyDelete
  4. *भेटीनंतर परतीचा प्रवास नकोसा वाटत असतो..*
    *पण काही सुंदर मार्ग हरवल्याशिवाय शोधता येत नाहीत."*🪷

    ReplyDelete
  5. Lovely 😍😍😍🌹🌹🌹

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.