अनुभवायचं असतं..(कविता)
अनुभवायचं असतं
फक्त जगायचं म्हणून जगू नये,
क्षणांचा अर्थ उलगडून घ्यायचा असतो..
हसण्यातली निरागसता,
आणि अश्रूतली शांतता
दोन्ही अनुभवायचं असतं..!
फुलं उमलतात म्हणून नव्हे,
त्यांच्या सुगंधात हरवायचं असतं..
वार्याच्या हलक्या स्पर्शात,
थरथरणाऱ्या मनाचं बोलणं
निरवपणे ऐकायचं असतं..!
जगण्यातली धाव पुरेशी नसते,
थोडं थांबून वाटही पाहायची असते..
मनाच्या कोपऱ्यातल्या गप्पा,
एखाद्या शांत संध्याकाळी
स्पंदनांनी ऐकायच्या असतात..!
आठवणी बनवायच्या नसतात,
त्या नकळत मनात जपल्या जातात..
माणसं जिंकायची नसतात,
ती मनापासून समजून घ्यायची असतात..!
कारण, जीवन हे जगण्यात नव्हे,
ते अनुभवण्यात सार्थ ठरते..
आणि प्रत्येक अनुभवातूनच,
मनुष्यपणाचे श्वासपर्व उभारते..!

अतिशय ओघवती शैली....आणि मनाला भिडणारे शब्द!👌👌👌👌
ReplyDeleteSuper very nice
DeleteReal meaning of Life , explained beautifully 💖💖💖💖💖
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery 🎉🎉
ReplyDelete