तहान... उभ्या आयुष्याची !
तहान
कधी वाटतं,
आयुष्य म्हणजे एक संथ वाऱ्यासारखं आहे —
न कळणाऱ्या दिशा,
न निश्चित ठिकाण.
फक्त चालत राहावं लागतं…
कधीकधी स्वतःलाही न समजणाऱ्या पावलांनी.
क्षणभर वाटतं,
"हेच तर पाहिजे होतं!"
आणि पुढच्याच वळणावर
तेच मागे फेकून चालतो आपण…
हातात न सुटलेली ओढ
आणि मनात न पुसलेला प्रश्न घेऊन.
सुख येतं,
अपूर्व आनंदासारखं…
पण थांबत नाही.
दुःख येतं,
मोकळ्या आभाळासारखं…
आणि हक्काने पसरतं.
या सार्याच्या मधोमध
एक व्यक्ती —
शोधत असते ‘काहीतरी’…
नाव नसलेलं,
शब्दात न मावणारं,
पण आत खोलवर असणारं.
ती व्यक्ती कधी "मी" असते,
कधी "तू",
कधी कुठलीही ओळख नसलेली एक झलक...
...आणि त्या शोधात,
सापडणं-हरवणं, थांबणं कुठेच नाही —
फक्त क्षणभर,
एखादा विचार आपल्याला बघतो
आणि आपण त्याचं उत्तर होतो…
क्षणभरासाठीच.
.jpg)
शोधात हरवलेलं, आणि त्याच हरवण्यात सापडलेलं काहीतरी... खूप सुंदर लिहिले आहे.
ReplyDeleteBeautiful....and profound 👌👌
ReplyDeleteWaah...🤩🤩🤩🤩🤩
ReplyDeleteJeevnache sukh dukhache pratayk shan agdi sundar panane sadar karnare mhanje tumhi
ReplyDeleteखूपच सुंदर ...
ReplyDelete