माझ्या कवितेच्या "रानफुला"


नाही तुला माळेत जागा,

नाही देवघरातली साज सज्जा,

तरीही तू बहरतोस

माझ्या शब्दांच्या मोकळ्या रानात..


कधी एकटा बसतोस पानगळीखाली,

कधी पावसात चिंब भिजतोस,

तुझं सौंदर्य इतकं अलवार,

आणि तरीही — ओसाडावर खुलतोस 


लोक विचारतात कवितेचा अर्थ,

मी फक्त तुझ्याकडे पाहते...

माझ्या कवितेच्या रानफुला

मोकळ्या मनाच्या संवेदना. 


नाहीस तू शोभेचा गुलाब,

पण आहेस माझी —

मनाच्या जमीनीवर

स्वतःहून उगवलेली कविता.


                                      - तेजश्री शिंदे ✍️ 





Comments

  1. रान फुल... अतिशय सुंदर कविता teju... रानफुलाला बोलण्याची संधी दिली तरी देखील इतक्या छान शब्दात तो स्वतःच्या भावना मांडू शकला नसता. इतक्या छान शब्दांमध्ये तू रानफुलाच्या भावना शब्दांकित केल्या आहेस. कविता वाचून मलाही रानफुल म्हणून बहरून यावे अशी इच्छा होत आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. कविता म्हणजे नेहमीच अलंकृत शब्दांची माळ असते असं नाही…
      कधी कधी ती असते रानात उगवलेलं एखादं साधं फूल —
      जे न मागताच, न पेरताच, उगवतं…
      आणि मग हळूच मनात खोलवर रुजतं.

      “माझ्या कवितेच्या रानफुला” ही कविता
      एका अशा प्रेरणेची गोष्ट आहे —
      जी ना सजावटीची आहे, ना स्वीकाराची मोहिनी बाळगते.
      ती आहे निखळ, नैसर्गिक आणि अगदी आपलीशी वाटणारी.

      हा रानफूल केवळ कवितेचा विषय नाही,
      तर ती अंतर्मनाची एक अवस्था आहे —
      जिथे भावना कोणत्याही औपचारिक चौकटीत न अडकता
      स्वतःहून उमलतात...
      आणि मग शब्दांना नवसंवेदनेचा श्वास मिळतो.

      Delete
  2. अंतर्मनातील विचारांनी भरलेली कविता म्हणजे 'रानफुल'.....

    ReplyDelete
  3. छान लिहिलं❤️

    ReplyDelete
  4. Khup chan mam

    ReplyDelete
  5. Khup chan tumchyasarkh agdi premal aani manala bhidnari hi kavita khup chan aahe

    ReplyDelete
  6. खूप सुंदर
    मनाला सहज भावलेले व मनाशी अलगदपणे स्पर्श करून जाणारे फुल शब्दरूपात आपण जे गुंतले आहे ते खरोखरच अतिशय सुंदर असे आहे.

    मनातील भावना ज्यावेळेस शब्दातून उमटतात त्यावेळेस साकारलेलं काव्य हृदयाला भिडणारे असे असते हे आपल्या काव्यातून मला जाणवले आहे आपल्या काव्य लेखनाला खूप खूप शुभेच्छा बालाजी नाईकवाडी..

    ReplyDelete
  7. खूप छान शब्दरचना आहे

    ReplyDelete
  8. Sundar kalpana ❤️❤️❤️

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.