बोन्साय...खुरटया विचारांचे वृक्ष !
बोन्साय
विवाह संस्थेचे बुजगावणे होऊन
माझ्या समोर ती बसली येवून..
जिच्या शिक्षणाची तलवार
झाली होती बोथट,
जी गहाण ठेवून आली होती
आपली विवेकबुद्धी,
आणि विचारात होती प्रश्न
स्वतःच्याच प्रतिबिंबावर.
मी अशी नव्हते हो....तिचा हा टाहो,
अस्तित्वाची घालमेल नि विचारांचा गुंता
सर्वच साशंकित...?
तुझे असे बोन्साय होत जाणे
नाही ग पहावत,
उघड तुझे पंख नि
घे मोकळा श्वास,
सृष्टीच्या निर्मिकावर
ठेव थोडा विश्वास,
परतून यायला आता
घरटेच नाही..
ही पराभूत जाणीव,
भिरकावून देत..
तू निर्माण कर स्वतःची वाट
तेव्हाच होईल स्वत्वाची पहाट
धीर धर जरा..
नि उचल पहिले पाऊल,
कणा अभिमानाने बोलू लागेल
मी बोन्साय नाही...!

So... Touchy... Awesome words... Great thoughts....
ReplyDeleteविवाह संस्थेच्या कचाट्यातून गेलेल्या प्रत्येकीच मनोगत
ReplyDeleteThat is great thing,
ReplyDeleteWe should always ready for challenges to break down on every time. You are convey good masaage for our society.
Best luck your next...!
Thank you 😊
Deleteखूपच बोलकी रचना आहे. निश्चितपणे वास्तविकता आहे पण एकूण पैकी प्रमाण व दिवसेंदिवस वाढत जाणारी संख्या विचार करायला भाग पाडणारी आहे. त्यातून तेजश्री मॅडम ज्या पोटतिडकीने त्यांचं समाजातील या समस्यावर योगदान देत आहेत, व त्याकडे व त्यांना मिळालेल्या संधीकडे सकारात्मक पाहण्याचा त्यांच्या प्रयत्नाला सलाम, बिग सॅल्यूट 🫡
ReplyDeleteमनापासून धन्यवाद 😊🙏
Deleteबोन्साय,,,,,,
ReplyDeleteखूप सुंदर लिहलय
Thanks Satish 😊
DeleteTeju,
ReplyDeleteबोन्साय ही वनस्पती शास्त्रातील एक छान अशी संकल्पना घेवून तू एक कवितेच्या रुपात एक विषय मांडला आहेस. विषय सुद्धा असा ज्वलंत. सामाजिक स्तरावर वरवर खपली पडलेली दिसत असली तरी आतून मात्र भळभळीत असणारी एक जखम, असा हा विषय आहे. आर्त भावनेने तू एक प्रसंग आणि तिच्याशी निगडित वर्तमान तसेच भविष्य शब्दबध्द करून कवितेचे रूप दिले आहेस. तू कवितेत निर्देश केलेप्रमाने तिने विचार करणे आजची गरज आहे.
नेहमी सारखे तुझी अचूक शब्दनिवड, सुंदर मांडणी, अलगद जपलेले यमक, सुरवात शेवट, कवितेचे शीर्षक, ब्लॉग ला दिलेला फोटो हे सर्व मोहून टाकणारे आहे.
शेवटी काय, खूप छान..
- अझहर
बोन्साय हे मोठ्या झाडाचे छोटे रूप आहे. बोन्साय केलेल्या वृक्षाची फुले, पाने, फळे आणि मुळे लहान प्रमाणात असतात. "आर्किटेक्ट' ज्या पद्धतीने घराचा "प्लॅन' बनवतो, तशीच पद्धत बोन्साय साकारताना वापरली जाते..एखाद्या वटवृक्षाला देखील या पद्धतीने लहान आकार देता येतो. अतिशय सुरेख कला आहे ही! त्या वटवृक्षालाही कळत नाही त्याचे बोन्साय झालेले... हा वटवृक्ष म्हणजेच प्रत्येक स्त्री आहे.. आणि तिला बोन्साय करणारे कलाकार समाजात अनेक असू शकतात... पैकी एक तिचा नवरा आहे... अतिशय सखोल विषय आहे.
Deleteतिच्या मर्यादा तो ठरवतो..
DeleteWow... One more creation.... One more direction for life... Awesome words by awesome personality...!
ReplyDeleteव्वा! सकारात्मक दृष्टीकोन👍👍
ReplyDeleteवाढ खुंटवू पाहणाऱ्या आयुष्याला जगण्याची नवी उमेद देत सर्व काही शक्य असल्याचा विश्वास देऊ पाहणाऱ्या कल्पवृक्षा सम आयुष्याची वेल फुलवून आनंद लुटण्यासाठी निर्भीड निर्णय घेण्याचे सामर्थ्य पेलण्याकरिता केलेला अट्टाहास अप्रतिम आहे....
ReplyDeleteज्ञानेश्वर जाधव
निर्णय घेणेच... सगळ्यात अवघड होऊन बसते...कारण मुळात आपण आयुष्य आपल्यापरीने जगू शकतो या विचारावरच तिचा विश्वास बसत नाही. त्यामुळे कित्येक जणी कल्पवृक्ष होण्यापूर्वीच स्वतःचे बोन्साय होने स्वीकारताना दिसतात.
Delete