चाहूल...निसटत्या क्षणांची!

 

चाहूल 


  पाठमोर्‍या तुला पाहून        

  वाटली होती द्याविशी हाक, 

  निसटत्या क्षणांना              

  ओल्या किनाऱ्याची साथ..  


  हात तुझा हाती घेवून          

  टाकावी नात्याची जुनी कात,

  उसळत्या भावनांना            

  थबकल्या पावलांची वाट..  


  तू माझा नसल्याची चाहूल    

  ही पहिल्या भेटीची खूणगाठ, 

  अजाणत्या जाणीवांना         

  उसन्या परतण्याची आस..   


  पाठमोर्‍या तुला पाहून        

  वाटली होती द्याविशी हाक..

                     

                                 -तेजश्री शिंदे 



Comments

  1. Khup Chhan👌👌👌

    ReplyDelete
  2. रोमँटिक लिखाण ❤️👌👌

    ReplyDelete
  3. Khoop chhaaaan,,,🤗

    ReplyDelete
  4. Khoop chhaaaan,,,🤗

    ReplyDelete
  5. खूप सुंदर मस्त

    ReplyDelete
  6. अतिशय सुरेख

    ReplyDelete
  7. Khoop chaan, medam🙏🙏🙏🙏

    ReplyDelete
  8. खूप सुंदर तेजू! भावनांशी सुसंवाद साधणे तुला चपखल जमते.. त्यात सुंदर शब्दांची भर.. म्हणूनच तर हा संवाद सुसंवाद होतो..

    का कोण जाणे मला वळवाच्या पावसात भीजावेसे वाटते
    तू पुन्हा येशील ह्या आशेवर अजून थोडेसे जगावेसे वाटते

    ही भावना तुझ्या ह्या सुंदर काव्यात डोकावते.. अशीच लिहित जा..

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद मंगेश... कविता ही कितपत संवाद साधते याबाबत मी साशंक आहे पण ती भावनांचा निचरा करते एवढे मात्र निश्चित! किती सुंदर ओळी लिहिल्या आहेस
      का कोण जाणे मला वळवाच्या पावसात भीजावेसे वाटते..
      तू पुन्हा येशील ह्या आशेवर अजून थोडेसे जगावेसे वाटते..
      ही आशाच तर आधार आहे..पुन्हा फिरून भेटण्याची.

      Delete
    2. 🙏😊

      Delete
    3. Amazing.. you guys are great 👍.
      You are blessed with power of perfect articulation of your thoughts and feelings in words ..

      Delete
  9. Tarif kro utni Kam... kay line aahet mam...

    ReplyDelete
  10. खुप छान

    ReplyDelete
  11. भावनांच्या हिंदोळ्यावर झोके घेत अनामिक ओढीने प्रीत पाझरणारी कविता... खरं तर शब्दच ... कशी सुचते तुला रचना, तरल भावना, शब्दसंपदा... सलाम तुला 🫡

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सुचित्रा दी..किती छान विश्लेषण केले आहेस. अनामिक ओढीने प्रीत पाझरणारी कविता!!! ओढ तर आहेच पण त्याला हाक मारण्यासाठी शब्दांनी मौन धारण केले आहे. प्रेमाला भाषा नसतेच. ते कसेही व्यक्त होत रहाते.

      Delete
  12. अशीच व्यक्त होत रहा, आणि आम्हा सगळ्यांना तुझ्या मौन धारण केलेल्या भावना रुपी शब्दात विहरण्याचं भाग्य मिळत राहु दे 🙌🏼

    ReplyDelete
  13. चाहूल निसटत्या क्षणाची..

    तेजु आज एक अती संवेदनशील विषय मांडला आहेस. कारण मनापासून एखादे नाते निभवणारा प्रतेक व्यक्ती या परिस्थिती मधून गेलेला असेल. कारण भेटीमध्ये सगळ्यात वाईट गोष्ट ही निरोपाची असते. तो क्षण येवूच नये असे वाटत असते आणि आलाच तर मात्र ती मनाची घालमेल, ती जड पावले, त्या ओलसर झालेल्या डोळ्यांचा पापण्यांच्या कडा, आणि वाढलेला श्वास, ती धडधड हे न सोसणारे असते. अशी ही परिस्थिती तू अगदी जशीच्या तशी डोळ्यासमोर येईल अश्या शब्दात रेखाटली आहेस. आणि कवितेचे शीर्षक तर अप्रतिम. खरंच द्यावीशी वाटते हाक, आणि परतण्याची असते आस...

    चाहूल.....
    अझहर

    ReplyDelete
    Replies
    1. जेव्हा एखादी भेट ही वास्तविक सोबत विरहच घेवून येते अशावेळी मात्र संभ्रम निर्माण होतो. तसेही नातेसंबंध हे गुंतागुंतीचे असतात परतुं कोणी तरी लिहून ठेवले आहे की.. प्रेमाचे सर्वात सुंदर रूप म्हणजे एखाद्याच्या डोळ्यात प्रेमाविषयी असलेल्या स्वतंत्र भावाचे हास्य होय.😊

      Delete
  14. बढिया कविता अप्रतिम. दुःख , ओढ आणि आस याचे मिश्रण आहे या कवितेत. एकीकडे कठोर निर्णय घेणाऱ्या क्षेत्रात काम करत असताना दुसरीकडे इतके हळवे तरल आणि संवेदनशील लिखाण करणे सोपे नाही पण तेजा तुला ती कला चांगली अवगत आहे आणि त्यात तुझी आता हातोटी झाली आहे असे वाटते.
    लिहित रहा व्यक्त होत रहा
    सौरभ

    ReplyDelete
  15. अजून काही ओळी वाचायला आवडल्या असत्या कारण कवितेचा आशय आणि विषय खूप छान आहे. अजून काही भावना पकडता आल्या असत्या

    ReplyDelete
    Replies
    1. नक्कीच प्रयत्न करेल 😊

      Delete
  16. तरल हळव्या भावना, जे निसटलंय ते आपलं नाही या प्रखर वास्तवाचं भान देणाऱ्या 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासून धन्यवाद सर 😊

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.