भ्रान्ति....गुलाबी रंगाच्या विचारांची!


 भ्रान्ति..


 या कातरवेळी 

ती उभी बावरी 

अन् किनारा 

बोलू लागला

 घेत कवेत 

तो वदू लागला

तीन शब्दांत 

तो मांडू लागला

सखे अपार 

ते प्रेम तुजवरी 

घोकू लागला

सांगू लागला 

ती बापडी!

खुळी बिचारी 

ठेच लागता

हाय! म्हणाली 

तीन शब्दांची

ती जादू विरली 

अन् तीन अक्षरात

ती कळून बुडाली

हाय! ठार बुडाली.


                           - तेजश्री शिंदे 

Comments

  1. Very nice 👌👍🙏

    ReplyDelete
  2. प्रेम म्हणाव की, विरह भ्रांती..., शब्दांच्या मलमांतून, जिवनातील शांती.!
    पद्यातून व्यक्त होतांना शब्दांची होती उत्क्रांती....,
    आणि अशाच शब्दांच्या वेलीवर तर सुरू आहे जिवनाची भ्रांती...!!
    श्री ज्ञानेश्वर जाधव.

    ReplyDelete
    Replies
    1. अप्रतिम अभिप्राय.. धन्यवाद ज्ञानेश्वर.

      Delete
  3. मस्त लय भारी

    ReplyDelete
  4. काही काहींना समजत नाही
    वेळ लागतो कळायला
    पण कविता वाचताना अस वाटतय खूप मस्त आहे अप्रतिम
    काही शब्द प्रश्न निर्माण करतात
    खरच म्याडम तुमची कविता मस्त आहे असच तुम्ही लिहीत जावे आणि सादर करावे

    धन्यवाद,,,,,🙏

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सतिश! कविता विचार करायला लावते हे खरे आहे..ती वास्तवाला समोर उभे करून स्वतःलाच प्रश्न विचारात आहे. हे गहन आहे आणि तेवढेच गंभीर...तरीही आपण समजून घेण्याचा प्रयत्न केलात त्यासाठी आभार.

      Delete
  5. कवितेचा अर्थ कळायला वेळ लागेल त्यासाठी ही कविता सतत वाचावी लागेल. मला कवयीत्रीचे कौतुक यासाठी करावेसे वाटते की एका बाजूला सातत्याने कामात व्यग्र असताना सुद्धा इतका सुंदर भावार्थ असलेली कविता तेजश्री यांना सुचते आणि ती शब्दबद्ध सुद्धा केली जाते. कवीला देखील शब्दरचना आणि काव्यपंक्ती याबाबतीत खूप विचार करून लिहावे लागते त्यासाठी वेळ काढावा लागतो. तेजश्री या कवितेसाठी वेळ काढतात व्यस्त वेळापत्रकातून देखील त्या त्यांची ही कला जोपासत आहेत यासाठी त्यांचे विशेष कौतुक.अशाच तरल आणि भावस्पर्शी काव्यलेखन तेजश्री यांनी करावे यासाठीत्याना अनेकानेक शुभेच्छा
    सौरभ

    ReplyDelete
    Replies
    1. मी शोधत रहाते अर्थ जगण्याचा
      शब्दांच्या दुनियेत कविता विणत
      कवितेतील माणसे मला
      अधिक समंजस वाटतात...
      किमान आपल्याला हवे तसे
      सुखावून जातात..
      कोणतेही गैरसमज न करता.

      म्हणून मी कवितेत रमते.

      Delete
  6. अप्रतिम तेजू,
    कितीही वेळा वाचली तरी आणखी वाचावी वाटते. एक दोन वेळा तर मी चाल लावून वाचली मी. वाचताना एखाद्या मराठी चित्रपटातील गाणे असल्यासारखे किंवा बहिणाबाई यांच्या लोकगीत सारखी वाटत होती. कोणत्या प्रकारात मोडते ही कविता एव्हढा माझा अभ्यास नाही. पण जे काही आहे ते सुंदर आणि अप्रतिम आहे. नेहमी प्रमाणे तुझ्या शब्दांची निवड मोजकी आणि अगदी अचूक आहे. तीन शब्दांची जादू, तीन अक्षरात विरून गेली अन् तुझी कविता मनाला भावून गेली.. भ्रांती...

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अझहर... बाई मन समजणे तसेही कठिणच..पण तरीही वाचक म्हणून माझी कविता समजून घेण्याचा तुम्ही जो प्रयत्न करता तो वाखाणण्याजोगा आहे. अतिशय मोजक्या शब्दात थोड्या वेगळया धाटणीची कविता लिहिली आहे... शब्द सांडून अर्थ मांडण्याचा एक प्रयत्न!

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.