मुक्तीचा मार्ग...(कविता)
मुक्तीचा मार्ग
मी चालत रहाते धर्माने सांगितलेला मुक्तीचा मार्ग
तो ईश्वर चराचरात आहे व्याप्त..
वैराग्य आणि स्वार्थत्याग तेव्हाच होईल साध्य..
जेव्हा आपलाच भासमान 'मी' सुटत जाईल अंतरंगातून
सामान्य माणसाच्या भ्रामक समजुतीतून..
तेव्हाच तो कर्मयोगी होऊन चालू लागेल भक्तीचा मार्ग
तो करेल मार्गक्रमण करून ऐहिक गोष्टींचा त्याग..
राग, लोभ, मोह-माया, मत्सर जातील विरून..
एक नवी पहाट उगवेल उत्क्रांतीचा नवा शोध लावून..
होमोसेपियन सेपियन पासून माणूस नावाचा प्राणी
तयार होण्याची सुप्तावस्थेतील ही सूक्ष्म प्रक्रिया
शोधत धुंडाळत रहाते मुक्तीचा अलिप्त मार्ग...!

आजच्या घडीला हे कविता खूपचांगली आहे ,,,समजून घेणे खूप गरजेचे आहे मस्त
ReplyDeleteThanks Satish
DeleteTeju, खूप दिवसांनी तुझे शब्द वाचायला भेटले. माझा शब्द संग्रह इतका तोकडा आहे तो ही तुझ्या शब्दांची प्रशंसा करून संपला आहे. तेच तेच शब्द आले तर कृपा करून समजून घे.
ReplyDelete12 ओळीमध्ये मुक्तीची परिभाषा तुझी खूप भावली मनाला. अगदी मोजक्या आणि मार्मिक शब्दात आयुष्याचा सार सांगण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहेस तू. खरंतर प्रत्येकाने,भासमान मी सोडून देणे गरजेचे आहे. पुन्हा एकदा तुझा अनुभव, तुझे अफाट वाचन, आणि वैचारिक प्रगल्भता तुझ्या शब्दातून जाणवली. छान पद्धतीने व्यक्त होताना एक गोड असा संदेश दिला आहेस जो व्यक्ती म्हणून जगताना उपयोगी पडेल. मुक्तीचा मार्ग धुंडळताना दिशादर्शक असे शब्द दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार.
धन्यवाद अझहर... मुळात या कवितेने खूप वेळ घेतला बघ...पण समाधान देवून गेली.
DeleteVery nice 👌👍
ReplyDelete