मुक्त... प्रवास अस्तित्वाकडून पूर्णत्वाकडे नेणारा...!
मुक्त
बौद्धिक- वैचारिक विचारांच्या ढगांवरील मळभ ,
झाकोळलेल्या नात्यांचे स्पंदन ,
भावनांच्या किरणांनी उजळून निघत आहे.
मी थबकलेली गांगरून शून्य होऊन पहात आहे.
सहजता हरवून बसलेल्या क्षणांना कुरवाळत
अर्धा जन्म वाया घालवणारी मी,
आता एकही संधी सोडू पहात नाही
चौकटी मोडून विचारांना मुक्त करण्याची...!
हे लादलेपण; हवे - नकोची संकल्पना
मूल्यांची घसरण; निर्णयात्मक अवगुण
नि र्दुष्टीकोनातून दूर होत चाललेले अर्थहीन जगणे
दृढतेने निश्चय करून मी दूर लोटून दिले आहे.
मी मुक्त होत आहे.
प्रश्नांच्या उत्तरातून, मनाच्या विकारातून,
बुद्धीच्या अवजडतेतून नि काळाच्या चक्रव्यूहातून.
हा प्रवास स्वातंत्र्याचे तत्त्व जपणारा,
अस्तित्वाकडून पूर्णत्वाकडे नेणारा...!!

Best lines अर्थपूर्ण विश्लेषण 👍🍀
ReplyDeleteThank you
Deleteतेजू तुझ लिखाण खूप छान आहे. तुझ्या कविता वाचताना मनात खोलवर रुजलेल्या प्रगल्भतेची जाणीव होते. अशीच लिहीत रहा .
ReplyDeleteतुझ्या निखळ अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
ReplyDeleteखूप साऱ्यातून मुक्त होणारी तू, ची कविता खूप छान विषय नी शब्द ...
ReplyDeleteकिती तरी ती... चे भावनिक विचार शब्दबद्ध केले आहेस तू.
मूल्यांची घसरण, दृढनिश्चय, बुध्दीची अवजडता, असे एकदम मार्मिक शब्दांची निवड केली असल्याने त्या भावनांची प्रखरता खूप खोलवर जाणवते..
अर्धा जन्म वाया घळवणारी ती आणि चौकट मोडून विचारांना मुक्त करण्याची एकही संधी न सोडणारी ती हा तसा पाहायला गेला तर खूप मोठा प्रवास आहे तू तो चार ओळीमध्ये बसवत असताना त्याची गंभीरता अजिबात कमी होवू दिली नाहीस.
वास्तव आणि कल्पना यांची सांगड घालून सगळ्या भावना व्यक्त करून ती चे मन मुक्त नक्कीच झाले असेल असा विश्वास आहे.
तुझ्या या मुक्त बद्दल बोलावे तितके थोडेच आहे. पण हा मुक्त तेचा प्रवास तू उत्तम प्रकारे शब्दांकन केलास आणि मीही त्याचा वाचक म्हणून मुक्त आस्वाद घेतला... खूप छान teju..
पुन्हा एकदा धन्यवाद अझहर...! माझ्या कवितांचा चोखंदळ वाचक म्हणुन तुझा अभिप्राय नेहेमीच विशेष ठरतो. माझ्या प्रत्येक कवितेचे परीक्षण बारकाईने करून ती उलगडून सांगण्याचा तुझा प्रयत्न स्तुत्य आहे... माझे अनेक वाचक देखील तुझ्या अभिप्रायाची वाट पाहत असतात. 😊😊
Deleteखरंच खूप अर्थपूर्ण लिखाण करतेस,खूप प्रगल्भ विचार आहेत, खूप सुंदर कविता तेजु, अशीच लिहीत रहा👍👍
ReplyDeleteThank you 😊
Deleteआत्ता सूर सापडलाय बघ. हाच भाव अभिप्रेत आहे आपल्या लेखणीतून.
ReplyDeleteThanks अक्षय... आयुष्य नव्याने जगण्यात हीच गंमत आहे बघ.. आपण एखाद्या चौकटीत अडकलो की तिथून पुढे प्रवास करणे जिकरीचे होऊन जाते त्यामुळे येणारा प्रत्येक अनुभव पुन्हा नव्याने जगण्यातील मजा काही औरच. माझ्या या प्रवासाचे तुम्ही सगळेच सोबती आहात ही खूप आनंदाची बाब आहे.
DeleteTeju khoopch sunder Kavita agdi manala bhavnari
ReplyDeleteThank you 😊
Delete