अनामिक (कविता)

 अनामिक 


न तू कधी बोललास..

न मला बोलावे लागले..

कळत नकळत नाते विश्वासाचे बनत गेले.


शब्द कधीच मुके झाले नि डोळ्यांनी संवाद साधला 

तुझ्या माझ्या असण्याला, अर्थ नवा लागला..!


अनामिक ओढ तुझी, सहजपणे खुलत गेली 

पहिल्या पावसाच्या सरींसारखी, मन चिंब भिजवून गेली..!


खुणावतात नव्या पाउल वाटा, नवी नजर भिरभिरते 

तुझ्या माझ्या अस्तित्वाला, साज नवा चढवून जाते..!


गुलाबाच्या पाकळ्यांचा, गुलकंद मुरत जातो..

नि मुरलेल्या नात्यांना, अवीट चव देवून जातो..!


कोलाहल मनातला, हिंदोळ्यांवर हेलकावतो..

भावनांची घुसळंन होऊन, अलगद वर तरंगतो..!


नात्याची सहजता, आपसूकच गवसत जाते..

तुझ्या माझ्या असण्याला, मूर्त रूप देऊन जाते..


तुझ्या माझ्या असण्याला, मूर्त रूप देऊन जाते..!!

                                                            -तेजश्री शिंदे 


Comments

  1. The rhythm of your lines and spaces is great, MAM

    ReplyDelete
  2. काही जुन्या आठवणी.....

    ReplyDelete
  3. छान जुन्या आठवणीचा संगम दिसतो

    ReplyDelete
    Replies
    1. Heart has spoken in human language

      Delete
  4. न कधी तू बोललास
    न मला बोलावे लागले

    शब्द कधीच मुके झाले
    अन् डोळ्यांनी संवाद साधला

    वाह तेजा अप्रतिम कविता लिहिली आहेस. हे जे सुचणे आहे आणि ते सुचलेले व्यक्त करता येणे आहे यालाच साहित्यिक कौशल्य म्हणतात.
    प्रत्येक कडव्यात वेगवेगळे उदाहरण पण प्रत्येक कडव्याचा अर्थ मनाला उमगणारा आणि समजणारा आणि खोलवर भावणारा👌👌👌

    ReplyDelete
  5. खूप छान कविता आहे,,,,,,,,

    ReplyDelete
  6. कविता खूपच छान आहे. अनामिक... म्हणजे ज्याचे वर्णन करणे शक्य नाही असा.., नावहिन...
    कवितेच्या ओळी ह्या खूप अर्थपूर्ण आहे. 👏यमक ही छान जुळले आहेत. मॅडम तुमचा कविता ना माझ्यासाठी 'आठवणींच भंडार'आहेत 😃💗

    न तू कधी बोललास..
    न मला बोलावे लागले..
    कळत नकळत नाते विश्वासाचे बनत गेले. (अतिशय सुंदर ओळी)

    ReplyDelete
  7. खूपच छान कविता 👌👍👌

    ReplyDelete
  8. Beautiful 🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

अलक ( एक सुंदर लेखनप्रकार )

अजूनही भटकते आहे..(गझल)

माणूस ओळखून ठार मारले गेले.