माहीर (कविता)
माहीर..
रोखला नयनात माझ्या तो यातनांचा पूर होता
पायात थिजलेल्या माझ्या भावनांचा जोर होता
पसरला चारी दिशांना तो केवड्याचा सुगंध होता
कुस्करलेल्या मोगऱ्याला माझ्या जाणिवांचा गंध होता
अंधारल्या रात्रीचा तो केविलवाणा प्रयास होता
उजळलेल्या पायवाटा माझ्या जीवनाचा सार होता
तुझ्या पहिल्या भेटीचा तो फुललेला शहारा होता
चांदण्यात रेंगाळणारा तो माझा चकोर होता
बहरलेल्या प्रीतीचा तो झुलता मनोरा होता
उसळलेल्या सागराला माझ्या यौवनाचा दुजोरा होता
उसवलेल्या विचारांना तो सांधणारा माहीर होता
शब्दात वेढलेल्या माझ्या जखमांचा शाहीर होता

जसा गुलाबाच्या पाकळ्यांमधून प्रेमाचा गुलकंद तयार होतो तसा या कवितेमधून शब्दांचा संग्रह तयार होतो
ReplyDeleteThank you 😊
Deleteखूप छान... रंगीबेरंगी रंगाप्रमाणे वेगवेगळ्या शब्दातून. तयार केलेली शब्दरचना खूप छान
ReplyDeleteधन्यवाद!
DeleteBeautiful poem 👌👌👌👌
ReplyDelete😊🙏
Deleteअतिशय सुंदर शब्द रचना
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteसुंदर 👌
ReplyDeleteAti sundar
ReplyDeleteExcellent..👌👍
ReplyDeleteखूप सुंदर.....
ReplyDelete😊
Deleteमस्त,,,,,सुंदर
ReplyDeleteकधी तू रिमझिम झरणारी बरसात
ReplyDeleteकधी तू चमचम करणारी चांदण्यात
कधी तू कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओली रात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चमचम करणारी चांदण्यात
कविता ह्या गाण्या सारखी आहे।
मस्त,।
Thanks Satish
Deleteमाहीर... Teju किती छान शब्द सुचला आहे तुला. तशी तू सुद्धा एक एक शब्द घेवून शब्दांचे जाळे करण्यात माहीर आहेस. तुझे ते शेवटचे शब्द उसवलेले विचार संधणारा माहीर आणि जखमांच्या शाहीर खूप ऊर्जा देणारे आहेत. यावेळी अभिप्राय ची सुरवात कवितेच्या शेवटच्या शब्दांनी करतोय.
ReplyDeleteसुरवातीच्या शब्दामध्ये आयुष्याच्या प्रवासात झालेल्या यातना, काहूर माजवनाऱ्या भावना, अंधाऱ्या रात्रीचे केविलवाणे प्रयत्न, तू कुस्करलेला मोगरा अश्या असंख्य मानवी भावनांनी भरलेलं एक वैचारिक मन पुर्णतः रित झालेलं आहे. वरवर छान सुंदर वाटणारे हे शब्द अत्यंत अर्थपूर्ण आणि खोलवर झालेल्या खपली पडलेल्या भळभळत असणाऱ्या जखमांची जाणीव करून देणारी आहेत.
पुढे मात्र कविता रोमँटिक होते. तो पहिला स्पर्श तो शहारा, तो चंद्र तो चकोर, ते यौवन तो मनोरा, या सगळ्यात बहरणारी प्रीत. वाह किती सुंदर यार teju..
आणि शेवटच्या ओळी तर प्रेमात पाडून प्रकाशा सह गडगडाट करणाऱ्या विजे सारखी धडकी भरणारी...
भरभरून कौतुक केल्याबद्दल धन्यवाद अझहर..! मुळात अशी कविता लिहिताना कवि म्हणुन कस लागतो... कविता लयीत येण्यासाठी शब्द देखील चपखल पणे निवडावे लागतात. माझ्या कविता या शक्यतो मुक्तछंदात असतात.. पण काल लिहिती झाले आणि ही कविता तुम्हा वाचकांच्या समोर आहे. कविता ही अशीच व्यक्त होत गेली आहे.
Deleteखूपच छान कविता... माहीर ❤️
ReplyDeleteजसा केवड्याचा गंध आणि मोग्ऱ्याचा सुगंध चारीही दिशांना पसरला आहे .तसा कवितेतही जाणवत आहे😃
अंधारल्या रात्रीचा तो केविलवाणा प्रयास होता
उजळलेल्या पायवाटा माझ्या जीवनाचा सार होता (Beautiful lines)
माहीर म्हणजे दक्ष, कुशल, होशियार, अभ्यस्त, मश्शाक़ ... खूपच छान शब्द सुचला आहे तुम्हाला 😍
खूप आवडली कविता..❤️❤️
"माहीर" हा खरच खूप सुंदर शब्द आहे आणि तो माहीर आहेच म्हणून आपसूकच तो शब्द स्मृतीतून कागदावर उतरला...तुझ्या सुंदर अभिप्रायाबद्दल धन्यवाद रिया!!
Deleteविविध प्रतिकांच्या उपयोजनातून प्रियसीच्या मनातील भावनेचा अप्रतिम रित्या आविष्कार केला आहे ....! खूप छान ..... तेजू .
ReplyDeleteThank you Shanti..!
Delete