निर्बुद्ध.... एक नवा अध्याय!
निर्बुद्ध
मी माझ्याच निर्बुद्धिचा एक नवा अध्याय होते
विझलेल्या त्या पणतीची न जळालेली वात होते
घेतले कवेत जेव्हा ते फुललेले तारुण्य होते
सुकलेल्या त्या फुलांचा मी पसरलेला गंध होते
माझ्याच जाणिवेचा मी उसळता विचार होते
मुक्तीच्या त्या सुरांनी भारलेला राग होते
आयुष्याच्या युद्धाचा मीच श्रीकृष्ण होते
ताणलेल्या शिवधनुष्याचा मी उभारी बाण होते
जीवनाच्या अनुभवांचा कोळलेला सार होते
जगलेल्या त्या क्षणांतील मी अव्यक्त काव्य होते
मी भविष्याचा ध्यास घेते
भूतकाळाचा अन्वर्थ घेते
वर्तमानाला छाटणारी मी दुधारी तलवार होते
मी माझ्याच निर्बुद्धिचा एक नवा अध्याय होते

आयुष्याच्या युद्धाचां मीच कृष्ण होते .(.. खूप काही शिकता येणारे तुमचे शब्द)
ReplyDeleteThank you. Senseless..ही एक term आहे. निर्बुद्ध झाल्या शिवाय बुद्धीची ओढ लागत नाही. आपण निर्बुद्ध आहोत हे समजल्यानंतरच एक नवा अध्याय सुरू होतो... नक्की आपण senseless का आहोत?? कोणामुळे आहोत? कशासाठी आहोत?? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रवास म्हणजेच निर्बुद्ध... एक नवा अध्याय.
Deleteमी माझ्याच निर्बुद्धिचा एक नवा अध्याय होते
ReplyDeleteविझलेल्या त्या पणतीची न जळालेली वात होते
खूप छान ,,,,
Thank you Satish 😊
Deleteआयुष्याच्या युद्धाचा मीच श्रीकृष्ण होते 👌
ReplyDeleteWow... Khup chan..
Thanks Riya..
Deleteशब्दरचना खूप छान आहे मस्त आहे कविता
ReplyDeleteThank you.
Deleteमला वाटतं स्वतःचा शोध घेण्याचा निर्बुद्ध एक वेगळी संकल्पना आहे.. अनोख्या पद्धतीने मांडणी केली आहे. शब्दरचना नेहमी प्रमाणे उत्तम.विचार करायला लावणारी कविता👌👌👌
ReplyDeleteखर आहे सुहास... हा स्वतःचा वेगळ्या अर्थाने घेतलेला शोधच आहे. बायका निर्बुद्ध असतात...मग त्या अशा का?? कशामुळे??? कोणामुळे?? अशी अनेक कारणे शोधत स्वतःचे आयुष्य वेगवेगळया टप्प्यांवर समृद्ध करत जाण्याचा प्रवास.... म्हणजेच निर्बुद्ध एक नवा अध्याय होय.
Deleteतुझ्या या निर्बुद्ध चा सारांश करायला शब्द अपुरे पडतील. तुझे हे शब्द म्हणजे जीवनाचा सार आहे. जिथे भूत भविष्य आणि वर्तमान यांचा मोजक्या शब्दात ठाव घेतला आहे. आपलीच निर्बुद्ध ची अवस्था कवयत्रिला एक नवा अध्याय वाटतो यातून सकारात्मकतेचा गंध येतो. विझलेली पणती आणि तिची न जळालेली वात यावरून तिला संपूर्ण जळता आले नाही किंवा जळू दिले नाही यामुळे तिचे अवघ्या आसमंताला प्रकाशमान करायचे स्वप्न भंगले असल्याची अलगद जाणीव होते. ऐन तारुण्यात सुद्धा संघर्षामुळे सुकून गेलेल्या भावना 2 ओळीत अगदी प्रखर पने उमटतात. पुन्हा नविन सुरवात करायची तिची धमक, आणि वेगळेपणाने जगण्याची तिची प्रचंड इच्छाशक्ती या आणि बऱ्याच गोष्टींचा बोध होतो. एखाद्या खचलेल्या व्यक्तीने तुझे हे शब्द मनापासून वाचल्यास तो पुन्हा नवीन भरारी घेण्यास सज्ज असेल इतके ते अस्सल आहेत. खूप छान teju.
ReplyDeleteवाह अझहर...खूप सुंदर समीक्षण. मुळात कविता ही ज्याने त्याने आपआपल्या परीने समजून घेण्याची प्रक्रिया आहे... पण तरीही कवि च्या विचारांच्या गाभ्या पर्यंत पोहोचून ती समजून तिचा अर्थ लावणे म्हणजे भारीच. तुझ्या समीक्षेची माझे वाचक देखील वाट पहात असतात.
ReplyDelete