सखी'चे पत्र (6).. वसंत बहरताना!
सखी'चे पत्र (6)
प्रिय अमर,
तुझे पत्र मिळाले आणि अनेक न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. मुळात अंतरिक अपेक्षा ही होतीच आणि आहे ही..पण काळाच्या ओघात ते एखाद्याला हक्काने सांगणे मात्र विरून गेलंय. आपली म्हणणारी काहीएक वर्षांनी आपलीच वाटेनाशी होतात... त्यांच्यातील बदल हा सतत टोचत रहातो... एकमेकांवर कुरघोडी करत ते कधी बाजूला होतात हे त्यांचे त्यांनाही कळत नाही. त्यामुळे माझी ओढ मी फारच व्यक्तीशः ठेवली आहे. माझे स्वतःचे आपले म्हणून एक विश्व आहे आणि त्यावर अधिराज्य ही माझ्याच विचारांचे!.. त्यामुळे तुला कधीच उशीर झाला नाही. तू व्यक्त होण्यासाठी तुझे तुझे घेतलेले ते स्वातंत्र्य आहे. तुझ्या भावना अन् विचारांचा मी नेहमीच आदर राखला आहे. मुळात आपल्या नात्यातच खूप अघळपघळ स्पेस आहे. तुझ्या पत्राची आतुरतेने वाट पहात होते..कारण कोणत्याही नात्यात संवाद हा हवाच.
तू व्यक्ती म्हणून नव्हे तर एक व्यक्तिमत्त्व म्हणून मी तुझ्या आकंठ प्रेमात आहे... हे काही वेगळे सांगायला नको. मला याची जाणीव आहेच, की तू शरीराने लांब असलास तरी विचारांनी आणि भावनांनी माझ्या अवतीभोवती सोबतीला आहेसच. पण खर सांगू का??? तुझे माझ्या आजूबाजूचे वास्तव्य मी प्रकर्षाने मिस करत आहे. तुझ्या व्यक्तिमत्त्वातील साधेपणा, विचारांची श्रीमंती, अबोल हसरा चेहरा... गुड मॉर्निंग अमर..बोलताच लुकलुकणारे तुझे डोळे, हसल्यावर गालावर पडणार्या गोड खळया, तोलूनमापून बोलण्याचा अंदाज...आणि....सारे काही.
वेळ सरून गेली आणि गोष्टी हातातून निसटून गेल्या की मग मागे वळून त्यावर विचार करण्यात काहीएक अर्थ उरत नाही.... त्यामुळे ते जगतानाच इतके भरभरून जगा की त्याची उत्कटता आपोआप शमून जाईल. म्हणून कदाचित माझ्या शब्दांची उत्कटता जरा जास्तच असते बघ. ते "अनुभवांना अधिक समृद्ध करतात" हे वाचून छान वाटलं. तुझ्यासोबत हे सगळं अनुभवता आले याचा वेगळाच आनंद आहे.
फेब्रुवारी महिना हा इतरांसाठी अनेक अर्थांनी महत्वपूर्ण असेल ही...पण आपल्यासाठी त्याचे महत्त्व काही निराळेच होते. तुझी अन् माझी पहिली भेट ही याच महिन्यातील. "ऐन गुलाबी थंडीचे दिवस... फेब्रुवारीच्या उत्तरार्धात वसंत ऋतु बहरून येण्याची सुरुवात आणि तू." त्या वर्षीच्या वसंतात माझी वठलेली प्रेमाची फांदी हिरवीगार झाली ती तुझ्या येण्यानेच. तू मात्र अनभिज्ञ. मुळात तुझ्यात काय आहे हेच तुला माहीत नाही. तुझ्या याच सरळ सुंदर स्वभावातील निरागसपणा भावला मनाला.
मुळात असं प्रगल्भतेकडे झुकत असताना एखादा तरुण आवडावा.. हे जरा भलतेच! इथे माझी आवड शारीरिक मुळीच नाही.. नव्हती. त्याही पलीकडे जाऊन प्रेमाला अनेक बाजू आहेतच की. एखादा पुरुष त्याच्या विचारांमुळे, बोलण्यामुळे, समंजसपणामुळे, स्वभाव म्हणून हवाहवासा वाटू शकतोच ना. प्लीज! मी इथे कुठेही समाज म्हणून लादलेली मूल्य ग्राह्य धरत नाही आहे. मुळात मी कधीच ती लादून घेतली नाहीत. पुरुषाने केला तर तो विवाहबाह्य संबंध आणि बाई प्रेमात पडली तर तोच व्यभिचार कसा रे होतो. पुरुषाला करण्याची मुभा बाई मात्र विचार ही शिवू शकत नाही....समाजाची ही भूमिका दुटप्पीपणाची नाही का वाटत तुला?? असो.
मी तुझ्या प्रेमात आहे हे स्वतःलाच सांगायला मला खूप वेळ लागला... भाववैचारिक विश्व फार गल्लत करत होते. पण तुझ्या ओढीने शोध घेत घेत मी माझ्याच 'स्व' पर्यंत कधी येऊन पोहोचले हे समजलेच नाही. हा प्रवास मात्र मला वैयक्तिक खूप काही देऊन गेला..आणि अजुनही देतच आहे.
तेरे खूबसूरत चेहरे से निखरते तेरे दिल पर,
यू सोचा और लिखा.. तो,
हम अपने ही बारे में लिखते गए।
फिर समझा..
तू कभी था ही नही मेरे सोच से परे ।
तू कभी था ही नही मेरे सोच से परे ।
रोज लवकर येणारी मी नेमकी त्याच दिवशी ऑफिसला लेट पोहोचले. तुझा ऑफिसचा पहिला दिवस.! सगळे कलीग्ज तुझ्या केबिन मध्ये बसले होते आणि सगळ्यात शेवटी माझी एंट्री. चेहर्यावर एक अबोल स्माईल असलेला, ऐन उमेदीतला बॉस पाहून मी तर तुझ्या अनिमिष डोळ्यांतील हास्यावर पाहता क्षणीच फिदा झाले बघ... या पलीकडे काहीच नाही. हळूहळू कामानिमित्त भेटणे बोलणे वाढले आणि नकळत तुला भेटण्याची ओढ वाढतच गेली. तू जरा जरी उशीरा आलास तरी हुरहुर वाटू लागली. माझ्या केबिन मधून तुझ्या येणार्या वाटेकडे माझे लक्ष लागून राहू लागले. तुला भेटण्यासाठी मन सतत उत्सुक असायचे. तुला त्यावेळी काय वाटत होते कुणास ठाऊक.. मी मात्र भिरभिरत होते.. तुझ्या वर्तुळाच्या परिघाबाहेर.
रोजचे ऑफिसला येणे आता अनेक कारणांसाठी बहारदार झाले होते. या अशा भावनांना मी बळी पडेल असे स्वप्नात सुद्धा वाटले नव्हते. पण आज तुला सगळे सांगावेसे वाटत आहे. किमान सुरुवात तरी म्हणून.
वसंत ऋतू याही वर्षी बहरून आलाय.. बकूळा, चाफा, गुलमोहर अन शाल्मली सुरेख फुलली आहेत. फुलांचा सुगंध सर्वदूर दरवळतोय..आणि माझ्या घराच्या गॅलरीत देखील रंगीबेरंगी फुले उमलून आली आहेत. सहज गॅलरीतून बागेकडे पाहताना वसंताच्या आगमनाने सर्व सृष्टि बहरण्यासाठी किती आतूर झाली आहे असं दिसतंय. फेसाळलेल्या कॉफी चा मग हातात धरून हे सगळं न्याहाळत असताना तुझ्या विचारांचं काहूर मनात दाटून येतंच...आणि मन आतुरतेने वाट पाहत रहातं वळीवाच्या पावसाचीच...!!
तुझ्या विचाराने बहरलेली
सखी

Very nice 👌👍
ReplyDeletePoem khup sundar ahe tyhun Visleshan adhik sundar
DeleteKhup khup chan
Delete😊🙏
Deleteजेवणाच्या मैफिलीमध्ये शब्दांच्या गुंफनामध्ये अलग वाटा एकत्र येतात
ReplyDeleteप्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा... तुझ प्रेम वेड असच दिवसागणिक अजून फुलत जावो हीच या प्रेमळ दिवसची सदीच्छा.....
ReplyDeleteआपल्या प्रेमळ शुभेच्छांसाठी धन्यवाद!
Deleteअसे भावनिक, आयुष्यात कधीही न विसरता येणारे प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यात येतात आणि बहुतेक जणांच्या आयुष्यातून पटकन निघूनही जातात. बर्याचदा या एकतर्फी प्रेमाची पालवी बेरोजगारीच्या प्रखर उन्हात कधी होरपळून जाते, ते त्यानाही समजत नाही. आजकालची प्रेमाची भावना आणि व्याख्या या मतलबी, भांडवली झाल्या आहेत. बेरोजगारी आणि भांडवली स्वप्नांच्या विळख्यात सापडलेल्या तरुणाईच्या पदरी निराशा, हतबलता पडत आहे. पण मनाची आणि प्रेमातील निरागसता आपल्या या लिखाणाच्या माध्यामातून टिकून रहावी अशी साधकबाधक अपेक्षा...
ReplyDeleteअतिशय दाहक भाव अनुभव अक्षय...! या विषयवार देखील लिखाण करायला आवडेल. आताच्या प्रेमाच्या भावना या खरोखरच भांडवली आणि मतलबी झाल्या आहेत... निखळ असे काही उरले नाही. त्यातही काही निरागस निखळ हाती लागतय का पहाते.
Deleteखूप सुंदर शेवटी मनाची घालमेल पत्रात व्यक्त केलीच👌
ReplyDeleteलिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
DeleteNo word to explain
ReplyDelete😊🙏
Deleteआपल्या या आमार आणि सखीच्या पत्ररुपाने समोर येणाऱ्या निखळ प्रेमाची कथा वाचण्यास खुप आनंद वाटतो,
ReplyDeleteइतके दिवस उगाच वाटत होत की आपण एक माणूस, एक व्यक्ती म्हणून लोकांच्या आठवणी मध्ये राहतो, परंतू आज सखीच्या पत्राच्या माध्यमातून समजलं की आपण एक व्यक्तिमत्व म्हणून आपण त्यांच्या आठवणी मध्ये राहायला हवं...
सखी आणि अमरची पत्र वाचत असतना खूप आनंद होतो...एक वाचक म्हणून आपण आम्हाला जो आनंद देत आहत त्यासाठी खूप खूप धन्यवाद
धन्यवाद अभिमन्यू...! माझे लिखाण आपल्याला निखळ आनंद देत आहे हे वाचून लेखक म्हणून फार समाधानी वाटतंय.
Deleteफेब्रुवारीच्या उत्तरार्धात वसंत ऋतु बहरून येण्याची सुरुवात आणि तू." त्या वर्षीच्या वसंतात माझी वठलेली प्रेमाची फांदी हिरवीगार झाली ती तुझ्या येण्यानेच... खूप खूप मस्त लिहिले आहे... मण असे तृप होत आहे वाचून.... खिडकीतून आलेला थंड वाऱ्या सारखे शब्द खूप काही आठवणी ना उजाळा देतात...
ReplyDeleteThank you so much 😊
DeleteThe beauty of love can't be expressed in words...and the person whom we love the most later we realise that we have become like that same person in every atoms and neutrons of our body.... beautiful ❤️
ReplyDeleteThanks for your beautiful reply 😊
DeleteSpeechless 😍😍😍
ReplyDelete😊🙏
DeleteLoved this Blog. Not everyone is blessed with this quality 😍😍😍. fly high and achieve success. God bless you ❤️💓💓💖💖💞💞
ReplyDeleteThank you sir.
Deleteसखी चे पत्र.. वाचले की समजते तीच असणार अमर वर प्रेम..😍 लांब असूनही ती पत्राद्वारे आपले प्रेम खूप छान व्यक्त करत आहे. म्हणजे तिचे अमर ला miss करणे. अमर च्या सर्व गोष्टी तिने खुप छान सांगितल्या. मूळात एखाद्या व्यक्तीवर प्रेम होतेच पण त्याच व्यक्तिमत्त्व समजायला लागले की त्यावर आजुन प्रेम होते.😃 माणूस जरी शरीराने लांब असला तरी मनाने.. तो आपल्या आवडत्या व्यक्तीचा जवळ असतोच. म्हणून त्या व्यक्तीसोबत घालवलेले क्षण हे कधीच त्याला न विसरण्या सारखे असतात. सखी अमरच्या प्रेमात आहे हे सांगायला तिला वेळ लागला तर खरा पण तिचे मात्र अमर वर प्रेम खूपच आहे हे सांगायलाच नको.😃
ReplyDeleteएखाद्या व्यक्तीची इतकी सवय लागली की त्याला थोडा जरी लेट झाला., Call message नाही झाला मन बेचैन होतेच.☺️
सखी ला आपल्या आणि अमरच्या सर्व गोष्टी आठवत आहे ह्यावरून एकच समजते.. तिला अमारची येणारी खूप आठवण..आणि तिचं प्रमे...
Absolutely Beautiful 🌹❤️..
सखी'चे प्रेम हे platonic love आहे. थोड्या वेगळ्या धाटणीचे. त्याच्या इतरही बाजू हळूहळू पत्र संवादांतून उलगडत जातील...सखी व अमर ला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद.
Deleteएखाद्या च्या वक्ती म्हणून नाही तर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रेमात असणं हे निखळ आणि निरपेक्ष प्रेमाचं प्रतीक आहे..
ReplyDeleteअसं प्रेम कालातील आणि अजरामर असतं.. मग ती व्यक्ती जवळ नसलं तरी त्याचे गुण, चांगुलपणा यावर प्रेम करत राहतो. यावेळी सखीने एक वेगळा आणि महत्वपूर्ण विचार मांडला आहे..
अप्रतिम पत्र 👍👌
वसंत बहरत आलाय..☺️
हो सुहास...वसंत बहरत आलाय.. आणि हा बहर वाचकांना एक प्रगल्भ अनुभव देवून जाईल यात काही शंका नाही. सखी ची स्वतःची अशी एक विचारसरणी आहेच. तिच्या प्रत्येक पत्रातून ती अमर सोबतच वाचकांशी देखील संवाद साधू पहात आहे.
Deleteपुढच्या पत्राची वाट बघतोय 😊
DeleteMuze lagta hai ye pyar wyar kuch nahi hota. Log apne khel ke liya dusro ko khilona bana dete hai... Aap ka pyar Amar ho to , aap kahani AMAR PREMI honi chahiye....
ReplyDeleteप्रेम अमर नहीं होता प्रेमभाव अमर है।
Deleteखरंच खूप छान सखीच पत्र आहे...💌🍁
ReplyDeleteThanks dear 😊
Deleteतुझ्या लेखांचे, कवितांचे, पत्रांचे वाचन करण्याचा प्रवास अखंड चालूच राहिला हवा....
ReplyDeleteमी ही प्रयत्न करत आहे अखंड लिहिण्याचा😌😊
Deleteसखी ची ती गॅलरी गॅलरी मध्ये फुललेली फुलांची रोपटी, आणि ती फेसळती कॉफी यांचा मेळ झाला की सखीच लिखाण सुरू. सखीच्या या पत्राचे खूप महत्त्व आहे. कारण यापूर्वी अमर चे उत्तर आले आहे आणि सखीचे पत्र फरवरी च्या माहोल मध्ये वाचावयास मिळत आहे. अमरच्या पत्रातील काही गोष्टींना उजाळा देवून सखिने पत्राची सुरवात केली आहे. नाते किती नितळ आणि निस्वार्थ होते हे काही ओळीमध्ये मांडले आहे सखीने. सोबतच नात्यात कोणताही स्वार्थ नव्हता शारीरिक आकर्षण तर अजिबात नव्हते हे ही सोष्ट केले आहे तिने. होता तो फक्त विचारांचा आणि भावनेचा गोडवा. साखिने आजच्या पत्रात अमर च्या विचारांची श्रीमंती, साधेपणा, लुकलुकणारे डोळे, स्मितहास्य अश्या अनेक गुणांचे वर्णन करून एकर्थी त्याचे कौतुक केले आहे. अमर आल्यानंतर ऑफिस चा पहिला दिवस, त्यांनतर ऑफिस मध्ये आलेली रंगत आणि कामात आलेली गंमत छान शब्दात मांडली आहे साखीने. वाचताना ते क्षण जणू आता घडत आहेत याचा भास होतो. मधेच त्या ओळी, सोचा कूछ लिखु तुम पर यांनी तर पत्राला बहर आणला आहे. या प्रेमाच्या आणि भावनेच्या शब्द मांडणी सोबत सखीला आणखी एक चांगली सवय आहे. समाजातील प्रचलित रूढी किंवा विचार याबद्दल आपले स्पष्ट मत मांडणे. यावेळी ही तिने ही संधी सोडलेली नाही. स्त्री पुरुषाचे नाते समाज कोणत्या दृष्टीने पाहतो त्याला काय नाव देतो हे वास्तव सुद्धा सखी ने स्पष्ट शब्दात सांगितले आहे. शरीराने दूर असले तरी नात्यात कोणताच दुरावा नाही है सांगायला सुद्धा सखी विसरली नाही. अमर असो किंवा सखी यांनी एकमेकांना वैचारिक प्रगल्भ केले आहे आणि एकमेकांचा शोध घेत त्यांना स्व चा शोध लागला आहे. यातच समाजाचे अलिखित नियम सखी मानत नाही हे ही तिने स्पष्ट केले आहे. सोबत, गुलमोहर, चाफा, शाल्मली बहरली आहेत. असाच बहर अमर आणि सखी च्या नात्यात नेहमी यावा त्यांच्या विचारांचा परीघ दिवसेंदिवस रुंदावत राहो.अमर सखी चे पात्रांचे नाते निरंतन चालावे या शुभेच्छा.
ReplyDeleteइतक्या सूक्ष्म पद्धतीने पत्र वाचून त्यात तुला भावलेले समजलेले आणि पटलेले तू अतिशय सरळ शब्दात सांगितले आहेस. अमर आणि सखी लोकांना इतकी आवडतील याची थोडीही कल्पना नव्हती...अनेक वर्षांनी लिहिती झाले म्हणून कदाचित लिखाणाचा ओघ जरा जास्तच आहे. हे सगळे वाचकांशी वाटून घेता आले यात एक वेगळाच आनंद आहे. इतक्या सुंदर समीक्षेकरिता मनापासून धन्यवाद अझहर!
Deleteबघताच ज्याला भान हरवते,
ReplyDeleteसमोर नसला की बेचैन मन होते
आठवणीच त्याच्या मग विश्व बनते यालाच
म्हणतात प्रेम कदाचित,
ज्याच्याविना आयुष्य थांबते…. खूप छान.. शब्द रचना..... आता च्या काळात फोन नसत तर. प्रेमाच अतूट नात पुन्हा पाहायला मिळालं असत...