सखी'चे पत्र (4)..निघून जाणे वाईटच!
पत्र (4)
प्रिय अमर,
वाट पाहणे हा काही माझा स्वभाव नाही...पण कधी तरी लिहीता होशील असे मात्र वाटले होते. तू जाऊन सहा महिने झाले...ऑफिसला निघण्याची तयारी करत होते... तेवढ्यात दारात पोस्टमन उभा! माझे नाव घेऊन एक पत्र माझ्या हातात देऊन तो ओझरता झाला...मी स्तब्ध...निश्चल...!
माझे नाव आणि पत्ता ज्या वळणदार अक्षरात लिहिले होते ते पाहून हे सुगंधी शब्दांचे पत्र तुझेच आहे याचा सुखद व आल्हाददायक धक्का बसला. आपण गाठलेल्या वैचारिक व मानसिक पल्ल्याचा वीट येवून पुन्हा थोडे लहान होऊन तुझ्या शब्दांना अनुभवण्याची तीव्र इच्छा झाली. पत्रातील एक-एक शब्द अनुभवला.
आज ऑफिसला जाताना फिकट निळी-गुलाबी रंगाची साडी नेसण्याचा मोह झाला. साडी आवडत असली तरी वर्षातून फारफार तर चार-पाच वेळा मी नेसत असेल. तीच साडी घालून तुझ्या केबिन चा दरवाजा उघडून गुड मॉर्निंग.. अमर.. अशी हाक मारताच तुझ्या नजरेतील बंदिश गझल बनून व्यक्त झाली..! त्या दिवशी घातलेला ब्लॅक शर्ट तुला खूपच सुट करत होता. आपल्यात बोलणे झाले...पण कोण कोणाशी काय बोलतोय याचा काहीएक ताळमेळ नव्हता... डीप फ्रीझ...!
टेबलाच्या पलीकडची तुझी घालमेल अगदी सहज माझ्यापर्यंत पोहोचत होती...आता उठून उभे रहावे आणि तुझ्या मिठीत विरघळून जावे.. इतकी अफाट भावना मनात येताच... शाम.. दरवाजा उघडून आत आला..."साहेब मीटिंगसाठी निघायचे आहे ना??" त्याच्या या प्रश्नाने आपण दोघेही थार्यावर आलो...आणि माझा निरोप घेऊन तू निघून गेलास.
तुझ्या पत्राने जुन्या सगळ्याच आठवणी अगदी आत्ता घडत आहेत असा फील येतोय. असो..बाकी नवीन ऑफिस काय म्हणतंय..?? नव्या शहरात रुळायला तसा वेळ लागतोच. त्यात नवीन माणसे.
कुछ दोस्त यार नए भी बनेंगे..
मगर मेरे यादों की खुशबू सदाबहार होगी..
कभी न बदलने वाले मौसम की तरह...!
तुझी मैत्रीण शर्वरी भेटली होती काल. रस्त्यात थांबून तुझी आठवण काढली. हल्लीच डिवोर्स झाला तिचा. तुला बोलली असेलच.. तिची फार घुसमट होत होती. पुरुषांना समजत नाही... बायका सगळे निमूट सहन करतील...पण त्यांचा आत्मसन्मान चिरडून तुम्ही तिच्यासमोर.. तुझ्याशी लग्न करून उपकार केले...ही भाषा कराल तर कसे चालेल ? शेवटी संसार दोघांनी मिळून होतो.. तो एकटा काय करणार होता. शरू ने खूप सहन केले.. मुलांसाठी म्हणून त्याला खूप समजावले... पण पैसा आला की माणसाची बुद्धी भ्रष्ट होऊन जाते... मुलाबाळांना सोडून सरळ निघून गेला गर्लफ्रेंड सोबत रहायला.
मुळात लग्नसंस्था फारच तोकडी होत चालली आहे... असे नाही का वाटत तुला? याला बरीच कारणे असतील.. बघ हं..आताची पिढी ही सर्रास लिव इन मध्ये राहणे पसंत करत आहे. कौटुंबिक कोणतीही जबाबदारी नको.. मूलबाळ नको... जोपर्यंत जमतय तोपर्यंत ठीक.. नाहीतर आहेच परत..जैसे थे..!! मी काही लग्नसंस्थेच्या विरोधात नाही..पण विचार करायला लावणार्या असंख्य घटना आजूबाजूला घडताना पाहतोच की आपण... त्यात शरू चा इतक्या वर्षाचा संसार असा मोडताना नाही बघवत रे..
मुळात इथे दोन व्यक्तींमधील नात्याचा संबंध आहे.. बाकी सारे नंतर. स्त्री-पुरुष यांच्यात एक नैसर्गिक बंध असतोच... पण कालांतराने ते बंध सैल पडत गेले तर मग भावनांचा खेळ करत त्या गोष्टीपासून मुक्त होण्यास ते तयार होत नाही... यात त्या दोघांची ससेहोलपट होते... त्यासोबत जोडलेली इतर नाती ही सफर होतातच ना. शांतपणे निर्णय घेत आजूबाजूच्या गोष्टींना जास्त इजा होऊ न देता मोकळे होता येतेच की!... पण हा समजूतदारपणा कोणी दाखवायचा.
जब इन्सानियत का गला घोट...वो
कहीं दूर...कहीं दूर चला जाता...
जिंदगी जीने का ख़ुशनुमा नाम देकर..
उष्णता खूप वाढत चालली आहे. हायड्रेट रहात जा. कामाच्या नादात तब्बेतीकडे दुर्लक्ष करू नकोस. नारळपाणी नाही जमत तरी ताक घेत जा. दिवस मावळायला लागला की दोन प्रहर निघून गेल्याची जाणीव सुन्न करुन जाते... निघून जाणे वाईटच... काळ.. वेळ.. दिवस.. क्षण.... आणि
अजुनही तुझ्या क्षणांत अडकलेली
सखी.

Nice 👌
ReplyDeleteThank you.
Deleteवहा.... छान👌
ReplyDeleteआयुष्यात अशा एका व्यक्तीचे असणं जरुरीचं असतं की, ज्याला
मनाची स्थिती सांगण्यासाठी
शब्दाची गरज भासणार नाही.....,🍁
Absolutely right dear..असा एक व्यक्ती हवाच... ज्याच्या सोबत नुसते बसलो तरी...अप्रतिम संवाद झाल्याची feeling यावी.
DeleteMadam aapki har story dil ko chu kar aar par ho jaati hai our kisiko yaad krne ke liye majbur krti hai....ise padhkar chahere pe thodi smile aankho me thodasa paani aa jaata hai....meri chahat hai aap aisehi badi badi story likhe our ek din badiiii...kitab market me aaye our mai uski kharidar banu...
ReplyDeleteआपके इस इज्जत अफजाई के लिए शुक्रिया!... अमर और सखी आपको पसन्द आ रहे है... ये सोचकर बहुत खुशी होती है!
Deleteवाह!
ReplyDeleteThanks Geetesh 😊
Deleteसर्वात जवळच नातं म्हणजे मैत्रीचं. आयुष्यभर साथ देणारे एकमेकांचे काळजी करणारे मैत्रीचं नातं.....
ReplyDeleteTuzi shabd rachna khup Chan ahe Tai 👌🏻👌🏻👌🏻
ReplyDeleteThank you so much.
Delete
ReplyDeleteनातं म्हणजे काय?
सुंदर उत्तर...
*नातं म्हणजे...परिक्षा नाही...
*पास किंवा नापास ठरवायला...
*नातं म्हणजे...स्पर्धा नाही...
*जिंकणं किंवा हरणं ठरवायला...
*" समोरच्याच्या मनाची काळजी...
*तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता...
*याची जाणीव म्हणजे नातं...
काही नाती ही आपसूकच जपली जातात... प्रेम ही भावना प्रत्येक नात्यात असतेच.. पण काही भावना या त्यापलीकडे जाऊन जीवन समृद्ध करतात.
Deleteकाही नाती ही आपसूकच जपली जातात... प्रेम ही भावना प्रत्येक नात्यात असतेच.. पण काही भावना या त्यापलीकडे जाऊन जीवन समृद्ध करतात.
Deleteअप्रतिम पत्र आहे,,,,,,
ReplyDeleteThank you Satish..!
Deleteवाह.. काय सुंदर उपमा देऊन सुरवात केली आहे. सुगंधी पत्र…खरंच आपल्या माणसाचं पत्र आलं ते नक्कीच सुगंधीच असणारच….
ReplyDeleteशर्वरीचे उदाहरण देऊन लग्नसंस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत… तरुणाची मानसिकता बदलत चालली आहे. लग्न काहींना खेळ वाटत असतो म्हणून घटस्फोटापर्यंत प्रकरणं जातात. सहनशीलता संपत चालल्याचं, नैतिकता, कमिटमेंट ढासळत चालल्याचं हे लक्षण आहे. सखीचा लग्नसंस्थेवर विश्वास आहे ही चांगली गोष्ट आहे.
समजूतदारपणा दोघांनी दाखवायला हवा… हेच खरं.
अमरच्या पत्रानंतर सखीने लिहिलेलं हे पत्र आहे. अमरच्या भावनांना सखी काय उत्तर देते त्याची उत्सुकता होती. पण या पत्रात दिसलं नाही. शर्वरीची एण्ट्री अचानक झाली. असो. काहीतरी लिंक असेल..
पण विरहाच्या जखमा फार जुन्या नाहीत… ६ महिनेच झालेत ना…
माणूस दूर गेला तरी काळजी असतेच.. सखी ज्या प्रकारे अमरची काळजी करत असते यातून प्रेम व्यक्त होत असतं.
सखीने ज्या प्रकारे या पत्राचा शेवट केला आहे तो अगदी मनाला भीडणारा आहे,,
निघून जाणे वाईटच... काळ.. वेळ.. दिवस.. क्षण.... आणि
अमर आणि सखी यांचे नाते हळूहळू उलगडत जाईल.. वरवर ते प्रियकर प्रेयसी दिसत असले तरी हे त्या पलीकडे जावून अनुभवावे लागेल. हळूहळू ते व्यक्त होतील....सुहास... आपण माझ्या लिखाणावर नेहेमीच निखळ प्रतिक्रिया देता याबद्दल अनेक धन्यवाद...ही पत्रे तुमच्या मनात हात घालतात हे कोणत्याही लेखकासाठी खूप मोठी गोष्ट आहे...माझा हा पाहिलाच प्रयत्न आहे... पत्राचा शेवट...आपल्याला भावला याबद्दल धन्यवाद!
DeleteTeju,
ReplyDeleteवाचताना जाणवत ही नाही इतके मुद्दे कव्हर केले आहेस तू. प्रेमभावना, काळजी आयुष्यातील नोकरीत निमित्त येणारे बदल, ती गुलाबी साडी आणि तो ब्लॅक शर्ट वाह. तुझे शब्द आणि त्यातील गंभीर मतितार्थ समजायला सुद्धा डोकं लावावं लागत. वरवर सामान्य आणि साधे वाटणारे तुझे शब्द तितकेच गंभीर आणि खोल अर्थपूर्ण असतात वाचनाऱ्याला समजले की त्याला काही क्षण धीरगंभीर करतात. बोलता बोलता शर्वरी ची कहाणी सांगून मृगजळ शोधणाऱ्या आणि त्या नादात स्वतःच्या संसाराची राखरांगोळी करणाऱ्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घेणाऱ्या स्त्री पुरुष यांचे केलेले वर्णन मानला भावून जाते. आजकाल चे हे वास्तव खूप भवणीक्तेने मांडले आहेस तू ज्याच्या कुणाच्या आयुष्यात असे घडले असेल तो तुझ्या शब्दाने क्षणभर का असेना सुन्न होईल. असे झाल्यावर स्त्री मनाची होणारी व्यथा सुद्धा तू मोजक्या शब्दात वर्णन केली आहेस. बदलत्या जगाबरोबर बदलणारी नाती आणि त्यांची लिव्ह इन सारखी नवे तसेच पूर्वापार चालत आलेली विवाह संस्था सारखी पवित्र परंपरा यांनासुद्धा तू अगदी स्पष्ट आणि भावनिक असा अलगद हात घालून मांडण्याचा प्रयत्न केला आहेस. Office च्या केबिन तुमच्या दोघांच्या मनाची घालमेल आणि ना बोलता होणारे तुमचे मिलन कोणीतरी अचानक येवून त्याला जाणारा तडा हासुद्धा प्रसंग मन हेलावून जातो. असंख्य प्रेमीयुगुलांचे बाबतीत घडणारा हा प्रसंग दाखवून त्यांच्या भावना सुद्धा तुझ्या शब्दाने जागृत झाल्या आहेत. इतके काही सांगायचे आहे पण तुझ्यासारखे शब्द माझ्यावर मेहेरबान नाहीत teju. जितकं मांडता येईल ते मांडले आहे बाकी तू समजून जा. खूपच छान. अमर आणि सखी च्या पत्राचे निमित्ताने असंख्य अश्या मनाची घुसमट शबरुपी अशीच व्यक्त करत जा शुभेच्छासह. अझहर..
बापरे.... अझहर माझ्या पत्राची अगदी बारकाईने समीक्षा केली आहेस.. मी पुर्वी लिखाण केले आहे... पण काळाच्या ओघात ते विरून गेले. पुन्हा लिहिती झाले हे महत्वपूर्ण! शेवटी कोणत्याही लेखकाची म्हणुन एक प्रक्रिया असते... तो असाच जन्म घेत नाही...मी ही हे माझ्यातील नवखेपण enjoy करत आहे... तुला माझे लिखाण भावते... हे वाचून आनंद झाला...तुझ्या सारखे मित्र प्रोत्साहन देण्यासाठी असले की भरून पावायला होते... अनेक धन्यवाद!
Deleteअमरच्या पत्रात जिवंतपणा होता तसेच सखीचा पत्रात ही आहे. सखी आणि अमर लांब असूनही एकमेकांची काळजी खूप छान करत आहे.आपण कितीही लांब असलो तरी..., नवीन माणसांसोबत ओळख झाली तरीही... अशी एक तरी व्यक्ती असते ज्याचा सहवास आपल्याला हवहवासा असतो....
ReplyDeleteMadam आता उत्सुकता अमर चे पत्र वाचायची आहे.
काही माणसे खासच असतात... त्यांचा आपल्या आयुष्यातील वावर खूप काही देऊन जातो.... अशी व्यक्ती लाभणे ही कठीणच.
Deleteतेजश्री मॅडम आपण सूर्या सारखे तेजस्वी आहात ....
ReplyDeleteThank you.
Delete💯💯👌👌👍
ReplyDeleteThank you.
Deleteजी व्यक्ती तुमच्या वर खरच प्रेम करते, तीच व्यक्ती तुमच्या बदल अस हृदय स्पर्श शब्दात लिहु शकते.... खरच लाजवाब तेजश्री मॅडम...
ReplyDeleteThank you 😊
Delete