हा खेळ माझा नव्हे..
हा खेळ माझा नव्हे.. वाटते मला असे की, हे शब्द माझे नव्हे गुंतलेल्या या शरीरातील, हे प्राण माझे नव्हे.. सोसलेल्या वेदनांची, देणी-घेणी बरीच बाकी मांडला तो सारा हिशोब, हा खेळ माझा नव्हे.. व्यक्त झाल्या भावनांचा, अर्थ गहिरा दाटला घेतला जो तू मनात, तो सार माझा नव्हे.. गुंफलेल्या जाणिवांची, माळ कोणी सांधली छेडलेल्या त्या स्वरातील, तो सूर माझा नव्हे.. - तेजश्री शिंदे