Posts

Showing posts from October, 2025

इंद्रधनुष्य.. (कविता)

Image
  इंद्रधनुष्य..  उगाचच फिरून फिरून,  मी तुला शोधत राहते, पाहिलेले अनुभवलेले,  पुन्हा पुन्हा जगू पाहते…! तू मात्र निसटून जातोस,  मुठीतल्या वाळूसारखा, अन अचानक समोर येतोस,  इंद्रधनुच्या रंगांसारखा…! आठवण तुझी इतकी की,  मनही तिच्या छायेत भिजते, तू नसतानाही तुझ्या असण्याने,  मी जिवंत दिसते…! कधी शब्दांत सामावतोस,  तू कुजबूजलेल्या वाऱ्यासारखा, कधी डोळ्यांत विरघळतोस,  मंद पावसाच्या थेंबासारखा…! आता सवयीनेच बोलते तुझ्याशी मनभर, तू येशील का नाही — हा प्रश्नही झाला निरुत्तर...!           - तेजश्री शिंदे ✍️