Posts

Showing posts from February, 2025

अमरचे पत्र (3) "अबोली सावल्या" - अर्थात हळव्या नात्यांची कवडसे!

Image
              अमरचे   पत्र (3)        अबोली सावल्या  प्रिय सखी,                 तुझे पत्र आले आणि मनात साठून राहिलेले सगळे शब्द ओघळून आले. तुझ्या शब्दांना एक अलगच ऊब असते, अगदी हिमाच्छादित कॅनडाच्या संथ हवेमध्येही ती ऊब कायम राहावी, अशी वाटते. तुझं पत्र वाचून —कधीकधी शब्दांनी उशीर करावा, पण संवाद अबाधित राहावा. नात्यांमध्ये जे बोललं जातं तेवढंच महत्त्वाचं नसतं, जे न बोलताही उमजतं, ते अधिक मौल्यवान असतं असं वाटलं.          तू म्हणालीस, मी मागे वळून पाहिलं पाहिजे. खरंच!पण सखी, मागे पाहण्यासाठीही कधीकधी धाडस लागतं. काही नाती क्षणभर वाट पाहतात आणि पुढे निघून जातात, काही आठवणींच्या हिंदोळ्यावर अर्धवट उभी राहतात, तर काही… कधीच पूर्णत्वाला जात नाहीत, फक्त मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत राहतात सदैव.            कदाचित त्यांची सुंदरता, त्याच अपूर्णत्वात असते.  कारण पूर्णत्व आले की प्रश्न सुटतात, पण अधुरेपण जपलं की त्यातली ओढ आयुष्य...

petals of my own.. अर्थात "स्वत:साठी फुललेले प्रेम"

Image
  petals of my own..  I no longer wait for someone to place beauty in my hands. I gather petals of my own choosing, soft, vibrant, alive. Love is not a quiet yearning, not a wish upon distant stars. It is the gentle act of giving, the courage to bloom for oneself. I do not wait. I do not long. I grow. And that is enough.                                                                                             - TejashriShinde ✍️ "स्वत:साठी फुललेले प्रेम" ही कविता आत्म-प्रेम, स्वावलंबन आणि स्वतःची कदर करण्याच्या सुंदर विचारातून स्फुरली आहे. आपल्याला दुसऱ्याच्या प्रेमाची प्रतीक्षा करण्याची आवश्यकता नाही. प्रेम ही एक कृती आहे जी आपल्याला स्वतःच्या हाती असलेल्या सौंदर्याच्या आणि प्रेमाच्या किमतीची जाणीव करून देते. या कवितेत स्वप्न आणि कधीकधी विसरलेली ओढ...