घालमेल.. (कविता)
घालमेल.. सर पावसाची उभी मना देईना गारवा कुठे हरवला माझ्या अंतरीचा तो बरवा.. अशी गाली उमटली लाज गुलाबी मारवा तुझ्या आठवांचा ऋतू खुले बहर हिरवा.. उगा व्याकुळ होऊनी साद घालतो पारवा कसा पाझर फुटेना मन झुरते राघवा.. प्रेम जहरी जहरी काटा काळजा रुतावा कुठे शोधता उतारा जन्म मायेचा चकवा.. - तेजश्री शिंदे ✍️