Posts

Showing posts from March, 2024

गंध.. प्रेमाचा दरवळ!

Image
  गंध.. तुझ्या एका स्पर्शाने, मी फुलून येतो  गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो.. भेट एकांती मला, मी हरपून येतो  मेघ हो पावसाचा, मी मृदगंध होतो.. बहरता हा वसंत, मी मोहरून येतो  गाली गुलाबी रंगाचा, मी मधुमास होतो.. साद घाल मजला, मी धावून येतो  तुझ्या अबोल प्रीतीचा, मी शब्द होतो.. तुझ्या नजरेत एव्हाना, मी दाटून येतो  दे मजला एक दान, मी भिक्षुक होतो..  गंध दे अंतरीचा, मी दरवळून येतो..                                                  - तेजश्री शिंदे ✍️