Posts

Showing posts from September, 2023

नियती.. (कविता)

Image
  नियती अंधाऱ्या रात्रीचा, सात्विक भास  गोठलेल्या वार्‍याचा, अनभिज्ञ श्वास  स्वप्न होवू पहात आहेत स्वार निसटून चाललेल्या काळावर  अनियत भविष्याचा, नीरव हुंकार.. घुटमळत रहातो, अस्तित्वाचा ज्वार मिटून दृष्टीचे, आक्षेपार्ह भार  उमलू पहात आहेत नव विचार  जुन्याच केलेल्या करारांवर  छुप्या शस्त्रांचा, मार्मिक वार.. विरक्त भावनांचा, केविलवाणा कयास  एकवटून भक्तीचा, परमोच्च ध्यास  निर्मिक घेवू पहात आहेत आकार  नियतीच्या अनामिक खेळावर  सृष्टीच्या उदरातील, ब्रह्मांड गर्भार  सृष्टीच्या उदरातील, ब्रह्मांड गर्भार...                                     - तेजश्री शिंदे