पुन्हा एकदा प्रेम करावे !
पुन्हा एकदा प्रेम करावे. वसंत बहरून आला परतून हाक मारण्या प्रिय नसावा.. दबकत यावे स्वप्नांनी त्या कासावीस तो जीव दिसावा.. पुन्हा एकदा बहरावे का? का? पुन्हा एकदा प्रेम करावे.. विसरून सारे परतून यावे पुन्हा एकदा अंकुरित व्हावे.. फुलवावा मधुमास असा की शब्द सुगंधी उमलून यावे.. पुन्हा एकदा बहरावे अन् पुन्हा एकदा प्रेम करावे.. ओंजळीतले रिते करूनी विश्वासाने पुन्हा भरावे.. अवचित सारे घडले तरीही देणाऱ्याचे हात व्हावे.. पुन्हा एकदा बहरावे अन् पुन्हा एकदा प्रेम करावे.. - तेजश्री शिंदे