Posts

Showing posts from May, 2024

मी निमित्तमात्र...आशा-निराशा.. रस्ते-वाटा.. सब झूठ!

Image
   मी निमित्तमात्र घडणार्‍या घटना दोलायमान काळातून  सरकत रहातात अविरत.. मी एकटाच विचारांच्या पिंजर्‍यात  कोणत्याही अटीशर्तींशिवाय दोन श्वासांच्या मधले गुदमरणारे आयुष्य  घटनांचा क्रम जुळवत.. मी शिकतोय रंगहीन होत जाण्याची पाण्यासारखी जुजबी कला.. या रासायनिक प्रक्रिया कितीही नकोशा वाटल्या तरी  सरधोपट गिरवत रहातो कित्ता  यातूनही घडेल काहीतरी उगाच  आशा-निराशा.. रस्ते-वाटा.. सब झूठ मी घडत जातोय की घडवला.. हा प्रश्नांचा गुथ्था की विचारांचे चक्र अनवरत फिरत रहाते काळाच्या ओघात  ही कसली पडझड हा कसला इतिहास  मी निमित्तमात्र...निःशब्द..निश्चल..!                                                                - तेजश्री शिंदे ✍️