रात्र...पुन्हा उमेदीने बहरून येणारी!
रात्र रात्रीस सवाल करावा आताशा कि स्वप्नांची दारे पुन्हा ठोठवावी.. नको ते शहारे जुन्या आठवांचे पुन्हा-पुन्हा रात्र काळी ठरावी.. फुटावे उमाळे न जुन्या आसवांना पुन्हा खेळ तोची जिव्हारी ठसावा.. नको ते सरावे जुन्या जाणिवांचे पुन्हा उमेदीने रात्र बहरून यावी.. नव्या स्वप्नमाला नभी चंद्र-तारा पुन्हा प्रीत दारी उमलू पहावी.. फुलांनी रात सारी मोहरून जावी..! - तेजश्री