Posts

सुंदरता (कविता)

Image
  सुंदरता बहुत सुंदर दिखते हो तुम... उस तरह नहीं जैसे सुंदरता बताई जाती है, बल्कि उस तरह जैसे अचानक दिल भर आता है। जैसे किसी हँसी के बीच आँखें भीग जाएँ, और वजह पूछने का मन ही न करे। तुम्हें देखते ही कुछ संभलता नहीं, कुछ बिखरता भी नहीं— बस अंदर कहीं एक हल्की-सी कसक जाग जाती है। तुम बोलते हो तो शब्द नहीं चुभते, धीरे-धीरे मन के कोने में जगह बना लेते हैं। और जब तुम सुनते हो, तो लगता है मेरी हर अधूरी बात पहले से ही तुम्हें पता थी। तुम्हारे पास होने में कोई दावा नहीं, फिर भी दिल खुद को थोड़ा और तुम्हारा मान लेता है। शायद इसलिए तुम्हारी याद कभी बेचैन नहीं करती— बस चुपचाप साथ चलती है। क्या कहूँ... सुंदरता अगर किसी एहसास का नाम है, तो बहुत सुंदर दिखते हो तुम— हर बार जब बिना वजह दिल भर आता है। - तेजश्री शिंदे ✍️ 

Selfie...( पाहण्याची नवी नजर)

Image
  Selfie : नजरेत अडकलेली प्रतिमा                              आज selfie हा शब्द इतका सामान्य झाला आहे की, तो उच्चारताच आपोआप एक कृती आठवते. फोन हातात घेतला जातो, कॅमेरा उघडला जातो आणि क्षणात एक प्रतिमा टिपली जाते. आपण त्या प्रतिमेकडे पाहतो, थोडं समाधान मानतो आणि पुढच्या कामात गुंतून जातो. पण selfie ही केवळ कृती नाही; ती आपल्या काळाची एक सवय आहे.                 ही सवय माणसाला सतत दिसत राहण्याची, नोंदवले जाण्याची आहे. जिथे शब्द थांबतात, तिथे प्रतिमा बोलू लागते. कधी ती आनंद दाखवते, कधी उत्साह, तर कधी केवळ “मी इथे होते” याची खूण. selfie म्हणजे आपल्या अस्तित्वाची एक छोटीशी सही असते.                  काही वेळा selfie ही गर्दीतून स्वतःला वेगळं करून दाखवण्याची गरज असते. आपण कुठे होतो, कोणासोबत होतो, हे सांगण्याची. पण त्याचवेळी ती एक शांत इच्छा देखील असू शकते— कोणाच्या नजरेत आपण कसे दिसतो, हे जाणून घेण्याची. त्या नजरेत आपल्याला ओळख...

वळणाने ठरलेली भेट (कविता)

Image
                   नात्यांच्या, भेटींच्या आणि ओढीच्या कथा नेहमीच ठरवून घडत नाहीत. काही क्षण असे असतात, जे निवडीपलीकडे जाऊन आयुष्याच्या वळणावर अलगद समोर येतात—ना कारण मागतात, ना उत्तर. ही कविता अशाच एका शांत, संयत आणि अपरिहार्य भेटीबद्दल आहे; जिथे जवळीक आहे पण हक्क नाही, ओढ आहे पण आसक्ती नाही, आणि मौनातूनच अर्थ गहिरे होत जातात. शब्द कमी आहेत, पण त्यामधली शांतता तुम्हाला थोडा वेळ थांबवून विचार करायला लावेल... ******* वळणाने ठरलेली भेट जुळल्या अशा दोन वाटा, आयुष्याच्या वळणाशी.. वळणानेच ठरवलं सगळं, कारणं मात्र दोघांच्याही ओठांवर कधीच उमटली नाहीत. भेट ही निवड नव्हती, ना जाणीवपूर्वक कृती.. ती घडली, जशी संध्याकाळ हळूच सावली वाढवत जाते, कुणालाही न विचारता. एकमेकांत हरवण्याचा मोह झाला, पण स्वतःला गमावण्याइतपत तो कधीच वाढला नाही.. म्हणूनच ही ओढ इतकी शांत राहिली. जवळीक होती, जशी दोन झाडांच्या सावल्या थोडा वेळ एकमेकांत मिसळतात, पण मुळं मात्र आपापल्या मातीशीच घट्ट असतात. काही न सांगता, काही न मागता, जसं लाटांनी किनाऱ्याला अलगद स्पर्शून मागे फिरावं.. ...

अमरचे पत्र (४) "न बोललेल्या दिशांचा नकाशा"

Image
  वाचकांसाठी… तुम्ही आतुरतेने वाट पाहत असलेली  अमर आणि सखी — यांच्या पत्रांची मालिका आज "रविवार विशेष" म्हणून घेऊन आले आहे.  ही पत्रं दोन व्यक्तींमधली असली, तरी त्यांचा आशय त्या दोघांपुरता मर्यादित नाही. यांचा संवाद निष्कर्ष देण्यासाठी नाही, तर प्रश्न जिवंत ठेवण्यासाठी आहे. या पत्रमालिकेत नात्यांना ठराविक नावं नाहीत. इथे ओढ आहे, पण आग्रह नाही; मौन आहे, पण अंतर नाही. जे बोललं जात नाही, तेच अधिक ठळकपणे जाणवत राहतं. मागच्या पत्रांमध्ये अपूर्णतेचं सौंदर्य, न बोलता उमजण्याचा विश्वास आणि समाजाने दिलेल्या चौकटींची शांत चिकित्सा हळूहळू उलगडत गेली आहे. अमर आणि सखी — यांची इतर पत्र वाचण्यासाठी खाली दिलेल्या link ला भेट द्या. 👇 https://tejashrishinde.blogspot.com/2023/02/2.html ***** अमरचे पत्र (४) "न बोललेल्या दिशांचा नकाशा" प्रिय सखी,               आज तुला पत्र लिहिताना शब्द मुद्दाम जपून वापरतो आहे. कारण काही वेळा भावना इतक्या नाजूक असतात की त्या ओळींमध्ये मोडतात.... पण परिच्छेदात श्वास घेतात. तुझं मागचं पत्र वाचल्यानंतर मनात एक प्रकारची...

अनिश्चित भिंती : शहर, सावली आणि आतल्या माणसाचा शोध | मराठी ललित लेख

Image
  अनिश्चित भिंती : शहर आणि सावली — 'कथा संपल्यानंतरही मनात राहिलेलं मुराकामीचं शहर...!' काही भिंती दिसतात, काही जाणवत राहतात. शहरात उभं राहताना माणूस ज्या सावलीला ओलांडतो, ती सावली कधी बाहेरची असते, तर कधी स्वतःच्या आत खोलवर रुजलेली.                हे पुस्तक मी “वाचायला” घेतलं नव्हतं.  ते माझ्या हातात आलं... आणि हळूहळू माझ्या आत शिरलं.  काही कादंबऱ्या आपल्याला गोष्ट सांगतात.  काही आपल्याला विचार करायला भाग पाडतात.                 The City and Its Uncertain Walls मात्र आपल्याला थांबवते.  ती सांगत नाही, समजावत नाही — ती फक्त शांतपणे आपल्या शेजारी बसते.              ही कादंबरी वाचताना मला सतत असं वाटत राहिलं की मी एखादं कथानक वाचत नाहीये; मी एका मानसिक अवकाशात फिरते आहे. असा अवकाश जिथे वेळेचा वेग वेगळा आहे, भावना मंदावलेल्या आहेत, आणि प्रत्येक गोष्ट जरा धूसर आहे — पण तरीही अस्वस्थ करणारी.              मुराकामी या काद...

सावली — कोरड्या जगातला एक श्वास !

Image
  सावली   मी चालतच आहे... या वाटेवर जिथे माणसं स्वतःच्या सावल्या हरवून बसली आहेत. सावली नसलेलं माणूसपण.. किती उघडं, किती असुरक्षित,  आणि किती निर्जीव वाटतं ना? इथे प्रत्येक चेहऱ्याला एक पोकळी आहे. जखमेपेक्षा खोल, आणि समुद्रापेक्षा हळव्या अशा शांततेची पोकळी. मी त्यांच्या शेजारून जाते... स्पर्श केला तरी जीव निघून जाईल असा निर्जल शांततेचा भस्मासू र त्यांच्या देहाला लागलेला. ते चालत आहेत... पण चालण्यात जीव नाही, आशा नाही, दिशा नाही. क्षणभर मला भीती वाटते.. या नीरवतेने माझे शब्द चोरले तर? या धुळीने माझ्या मनाचा उमाळा वाळवला तर? आणि मग, जणू आकाशाने एखादी गुपचूप खिडकी उघडावी तसा एक सौम्य प्रकाश माझ्या डोळ्यांत उतरतो. मी थांबते. एक झाड. सगळ्या कोरड्या गर्दीत एक भरलेलं झाड. फुलांनी भारलेली फांदी, पानांना जीवाची धडधड, आणि मुळांमध्ये अनामिक ओल. मी त्याच्या खोडाला टेकते.. किती शांत, किती उबदार, किती जीवंत! त्याने शब्द न बोलता माझ्यातील पोकळीत हळुवार श्वास भरला. मग लक्षात येतं.. ही सावली साधी सावली नाही, हा गारवा साधा गारवा नाही, आणि हे झाडही एक झाड नाही. ही माझ्या आत्म्याला मिळालेली ...

रूपकगद्य ...भावनांचे रूपांतरण करणारा लेखनप्रकार!

Image
  रूपकगद्य   भावनांचे रूपांतरण करणारा लेखनप्रकार (प्रस्तावना)               पोलीस खात्यात दैनंदिन कामकाजातून वेळ काढून दररोज लिहिता येणे थोडे कठिणच...पण हक्काची सुट्टी मिळाली की घर आणि नोकरी सोडून स्वतःला असा वेळ देणे म्हणजे लिखाण आणि वाचन करणे...हे सोयीने आलेच...म्हणुनच लागोपाठ हा दुसरा ब्लॉग लिहीत आहे.  😊😊              मागील ब्लॉग मध्ये आपण " अलक"  हा लेखनप्रकार आणि त्याची गुण वैशिष्ट्य पाहिली. साहित्यामध्ये काही लेखनप्रकार असे असतात, जे सहज वर्गीकरणात बसत नाहीत. ते कविता नाहीत, कथा नाहीत, आणि निबंधही नाहीत— परंतु या तिन्हींचे सुंदर आणि सूक्ष्म गुण त्यांच्यात मिसळलेले असतात.  " रूपकगद्य" हा असाच एक अद्वितीय लेखनप्रकार आहे—गूढ, काव्यमय, आणि प्रतीकांनी भरलेला.                 अलक आणि रूपकगद्य हे दोन्ही काव्यमय लेखनप्रकार असले तरी त्यांची अभिव्यक्ती वेगळी असते. अलक हा अत्यंत मितभाषी, सूचक आणि एका क्षणावर आधारलेला प्रकार आहे...जिथे शब्द कमी, पण अर्थ खोल ...